Pune Koyta gang : हॉटेलच्या बिलावरून वाद; कोयता गॅंगने हॉटेल चालकावर उगारला कोयता
पुण्यात कोयता गॅंगची दहशत बघायला मिळाली आहे. हॉटेलच्या बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उगारला आहे.
पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत बघायला मिळाली आहे. हॉटेलच्या ( Pune Koyta Gang) बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उगारला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सोमवारी ही घटना घडली आहे. सध्या पुण्यात अनेक ठिकाणी कोयत्या गॅंगने दहशत माजवल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शूल्लक कारणांवरून पुणे शहरात कोयता गँग दहशत माजवण्याचे प्रकार सुरूच आहे.
याच प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. याच हॉटेल्या मालकासोबत या कोयता गॅंगमधील तरुणांची बाचाबाची सुरु असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला दोघेही हॉटेल मालकाला पैसे देतात त्यानंतर त्याच्यावर अरेरावी करतात. त्यानंतर या कोयता गॅंगमधील दोघांमध्येच भांडण होताना दिसत आहे. यानंतर थेट कोयता उगारल्याचं सीटीटीव्हीत दिसत आहे. भरसस्त्यात हा प्रकार घडत असल्याचं पाहून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावऱण निर्माण झालं होतं शिवाय परिसरातदेखील दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दहशत कधी थांबणार?
काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरात म्हाडा वसाहतीत कोयता टोळीचा राडा पाहायला मिळाला. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. हल्ल्यात मिलिंद मधुकर कांबळे वय 23 हा तरुण गंभीर जखमी झाला होता. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन टोळके आणि मिलिंद यांच्यात वाद झाला होता. वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहत असलेल्या परिसरात येऊन हल्ला केल्याने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.
कोयता गँगची दहशत कायम...
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच, यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.