एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस घेणार अमेरिकेच्या FBIची मदत

कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिस अमेरिकेच्या तपास यंत्रणेने एफबीआयची मदत घेणार आहे.

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा राव या तेलगु कवीच्या घरातुन कॉम्पुटर हार्डडिस्क हस्तगत करण्यात आली होती. या हार्डडिस्कमध्ये काय माहिती होती हे जाणून घेण्यासाठी पुणे पोलिस एफबीआयची मदत घेण्यार आहेत. त्यासाठी ही हार्डडिस्क अमेरिकेतील एफबीआय या तपास यंत्रणेकडे पुणे पोलिस पाठवणार आहेत. एफबीआय(Federal Bureau of Investigation)या अमेरिकन तपास यंत्रणेने त्याला संमती दिली आहे की नाही हे मात्र अजुनही समुज शकलेले नाही. कोरेगाव भीमा या ठिकाणी एक जानेवारी 2018 ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलीसांनी वरवरा राव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केलीली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिसांच्या या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. पुणे पोलीसांनी केलेली ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. वरवरा राव यांच्या काही कविता देखील या पत्रकार परिषदेत म्हणून दाखवल्या होत्या. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हा बंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 28 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. कोरेगाव-भीमाच्या लढाईला येत्या 1 जानेवारीला 202 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने इथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन समारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी 160 जणांना नोटीस बजावली आहे. यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (22 डिसेंबर) या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्या - उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आरे आणि नाणार प्रकल्पाविरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर आता मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आंदोलन आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकजणांनी ही मागणी केली आहे. हेही वाचा - Urban Naxal Case | गौतम नवलखांचा जामीन पुणे स्पेशल कोर्टाने फेटाळला, अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव Koregaon-Bhima | कोरेगाव-भीमा येथील कार्यक्रमानिमित्त संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुणे जिल्हाबंदी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget