एक्स्प्लोर
दोन्ही बाजूंनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण, किशोर धनकुडेंचा विक्रम

पुणे : पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे. दोन्ही बाजुंनी एव्हरेस्ट सर करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक आहेत. किशोर धनकुडे यांची चढाई काल सकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. महाविद्यालयात असतानाच त्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली होती. गेल्या सात वर्षांपासून ते गिर्यारोहण करतात. 2014 साली त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिशेने म्हणजे चिनच्या दिशेने एव्हरेस्ट शिखर सर कलं होतं. तर आता त्यांनी दिक्षिणेकडून म्हणेज नेपाळमधून एव्हरेस्ट सर केलं आहे.
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा





















