एक्स्प्लोर

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'

Rohit Pawar: इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल बोलण्यात आलं. पैसे घेतले असा आरोप केला. इथे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी आले आहेत, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

पुणे : पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आज रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते जे मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र आहेत असे म्हटले आहे. ते विद्यार्थ्यांऐवजी मित्राची जास्त काळजी घेत आहेत असा आरोप केला आहे. पुढे बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, आज संध्याकाळपर्यंत काहीतरी निरोप द्या विद्यार्थ्यांना भेटा, नाहीतर उद्या मात्र विद्यार्थी वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग अध्यक्षांचा सोडा सरकारचा देखील राजीनामा घ्यावा लागेल, असा अल्टिमेटम रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या विद्यार्थ्यांशी बोला, सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा विचार करतील असंही रोहित पवारांनी म्हटलंय.(Rohit Pawar)

इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल बोलण्यात आलं. पैसे घेतले असा आरोप केला. इथे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी आले आहेत  यांना बोलणं म्हणजे सत्ताधारी लोकांचे एवढं म्हणणं आहे की, जे गरीब लोक आहेत, त्यांना दुसरं काहीच काम नाही, मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून हिणवत आहेत. सत्ताधारी लोक गरीबाची थट्टा करत आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांची मजा करत आहेत. एमपीएसीच्या अध्यक्षांना हटवा, हीच मागणी कायम आहे, एमपीएससीचा शुद्धीकरण झालंच पाहिजे. शुद्धीकरण करायचं असेल तर अध्यक्ष हटवावंच लागेल. आम्हाला आयोगाचे अध्यक्ष तिथं नकोच आहेत, आज संध्याकाळी आम्ही सांगू की उद्यापासून आंदोलन कसं करणार आहोत आणि आंदोलनाचे स्वरूप काय असणार आहे, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं  आहे. (Rohit Pawar)

राज्य सरकारकडून शेतकरी वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहेत, विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार असताना त्यांचं लोकांशी नातं तुटलं आहे. दुष्काळात शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांना कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. आता कोटी रुपयांचे लँड क्रूजर खरेदीसाठी घाट घातला जात आहे. लंडनमध्ये एका खाजगी कंपन्यांच्या कार्यक्रमाला सरकारी अधिकारी सरकारी खर्चातून जात आहेत. पाच कोटी रुपये फक्त आयोजनासाठी दिले आहेत. त्यामुळे या अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. 

पुढे रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट करावं लागेल ना? भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते जे मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र असतील, कॉलेजमध्ये त्यांनी एकत्रीत अभ्यास केला असेल. त्याच्याच बरोबर आयएस अधिकारी कोणी बनवलं? तर मुख्यमंत्र्यांनी बनवलं आहे. त्याचबरोबर 6 वर्षे आरटीओ कमिशनर त्यांना कोणी केले असेल? तर ते मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे. त्याच्याबरोबर आयोगाचे अध्यक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बनवलं. मग आता मित्राबद्दल निर्णय घेताना जर विद्यार्थ्यांकडून मागणी होत असेल मित्राला हटवा तर दोन-तीन दिवसात हा विषय व्हायला पाहिजे होता. पण एवढा काळ जर हा विषय खेचला जात असेल तर मुख्यमंत्रीसाहेब मित्राचा विचार जास्त करत आहेत. सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांचा करत नाही हे कुठे तरी सिद्ध होतंय. कारण भीमनवारांना टार्गेट करत असताना ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा निर्णय आहे म्हणजे मुख्यमंत्रीसाहेबांनासुद्धा टार्गेट करावं लागेल, असंही रोहित पवारांनी म्हटलंय.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Embed widget