एक्स्प्लोर

जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली, यूपीत मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा कट उघड

नरसिंहानंद सरस्वती, जितेंद्र नारायण निशाण्यावरयूपीत होणाऱ्या भाजपच्या रॅलीवरही हल्ल्याचा प्लॅन

पुणे : दिल्ली आणि उत्तरप्रदेशात (Delhi and Uttar Pradesh) मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद (Junaid Mohammed) आणि त्याच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) आज उघडकीला आणला आहे. दिल्ली, यूपीतील तीन प्रमुख लोकांवर हल्ला करण्याचा कट आखल्याप्रकरणी पुण्यातून एटीएसने अतिरेक्यांना अटक केली आहे.

यूपीत होणाऱ्या भाजपच्या (BJP) रॅलीवर हल्ल्याचा प्लॅन

पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले करणार होते. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तीन व्यक्तींवर हल्ल्याच्या तयारीत होते. इतकेच नव्हे तर उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रॅलीवर देखील हल्ला करायचा प्लॅन  बनवला होता. 

स्फोटकांसाठी पैसे,वस्तू पाकिस्तानातून येत असल्याची माहिती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टरमाईडकडून येणार होते. जो प्लॅन आखला जाणार त्यासाठी जुनेद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. जुनेद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने आत्तापर्यंत सतराहून अधिक फेसबुक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा. 

जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद मोहम्मद याला पुण्यातील दापोडी भागातून 24  मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते.

नरसिंहानंद सरस्वती, जितेंद्र नारायण निशाण्यावर

नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबाद मधील असलेल्या शिवशक्ती धामचे महंत आहे. ते हिंदू स्वाभिमान नावाची संस्था देखील चालवतात. त्यांनी अनेक वेळा प्रक्षोबक वक्तव्ये केली आहेत. जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहे.  वसीम रिजवी यांनी सनातन धर्मात प्रवेश केला होता. संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशचे असून वादात सापडलेल्या गणायांचे ते लेखक आहेत. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक म्हणून देखील आचार्य यांची ओळख होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget