Theft at a Jewellery shop in Pune : पुण्यातील वारजे माळवाडी येथील ज्वेलर्स दुकानात चोरी झाल्याची घटना घडली. वारजे माळवाडीतील एनडीए रस्त्यालगत असणाऱ्या माऊली ज्वेलर्स दुकानात भर दुपारी ही चोरी झाल्याचा प्रकार घडला. दुकानाचे मालक हे दुकान बंद करुन जेवण करण्यासाठी गेले असता चोरट्यांनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडला आहे.


दरम्यान, चोरट्यांनी दोन दुकानांमधील भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. अंदाजे 30 लाखाचे दागिने लंपास केले आहेत. दुकान लुटण्यासाठी चोरट्यांनी शक्कल लढवत सराफाच्या दुकानाच्या शेजारी असलेले मोकळे दुकान भाड्याने घेत त्या दुकानातून सराफाच्या दुकानापर्यंत भिंत फोडून चोरी केली आहे. घटनेनंतर वारजे पोलीस, डॉग स्कॉड पथक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 




चोरट्यांनी सराफी दुकानाच्या शेजारीच रितसर भाड्यानं दुकान घेतले होते. तिथे व्यावसाय करीत असल्याचे त्यांनी भासविले. एक दिवस भाड्याचे दुकान व सराफी दुकानामधील भिंत भरदिवसा फोडली. त्यानंतर दुकानामधील सोने, चांदी, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज हुशार चोरट्यांनी लंपास केले. ही घटना वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात गुरुवारी दुपारी अडीच ते पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली. चोरट्यांनी दुकानामधील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लाखो रुपयांच्या रकमेचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान, दुकानदाराने सुरक्षिततेच्यादृष्टीने लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. तसेच दोघे चोरटे मुद्देमाल चोरुन नेताना उघडकीस आले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.


पुणे शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ज्वलर्स दुकान, घरफोडी, वाहनचोरी अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांना देखील दक्ष राहावं लागत आहेत. तसेचं या घटना रोखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे.


महत्त्वाच्या बातम्या: