Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या म्हणालेत.


मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला आहे. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असेही ते म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे. हा साडेबारा जनतेचा सत्याचा आग्रह असल्याचे सोमय्या म्हणाले. अनिल परबला आज ना उद्या काढावचं लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले. 




हा हातोडी ठाकरे सरकारमधील जे लघोटाळेबाज, अनाधिकृत बांधकाम, वसुलीचा पैसा घेतायेत त्या माफियांच्या विरोधात असल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत काय भाषण करतात की, माझा माणूस अनाधिकृत बांधकाम करणार, हे काय मुख्यमंत्री आहेक काय? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. ठाकरे पोलिसांना नाचवतात, पोलीस जनतेचे आहेत. दरम्यान, हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा असे आव्हान देखील सोमय्या यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो असेही ते म्हणाले. 


नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागणार, हे चालू देणार नसल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तत्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला. 


महत्त्वाच्या बातम्या: