एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद आदिल छातीचा कोट करुन उभा राहिला, दहशतवाद्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या!

Pahalgam Terror Attack : सय्यद आदिल हुसैन शाह यानं भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्यापैकी एकाशी लढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याच्यावर गोळीबार करुन त्याला देखील संपवण्यात आलं.

Pahalgam Terrorist Attack श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेत स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह (Syed Adil Hussain Shah) याच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. सय्यद आदिल हुसैन शाह पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करत होता. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल शाह यानं धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. 

आदिल हुसैन घोड्यावरुन पर्यटकांना सफर घडवायचा. त्यानं एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. सय्यद आदिल हुसैन शाह पर्यटकांना  कार पार्किंग पासून बैसारन म्हणजेच मैदानापर्यंत घेऊन जायचा. सय्यद आदिल हुसैन शाह यानं दहशतवाद्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली. आदिल हुसैन शाह यानं त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. 

कुटुंबात कमवणारा एकुलता एक व्यक्ती 

रिपोर्टनुसार आणि सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबामध्ये पैसे कमावणारा तो एकमेव व्यक्ती होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 व्यक्तींचा मृत्यू झाला ज्यात दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पहलगामच्या घटनेत मृत्यू झालेला सय्यद आदिल हुसैन शाह एकमेव व्यक्ती होती. त्याच्या पश्चात कुटुंबात वयस्कर आई वडील, पत्नी, मुलं आहे. सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. 

दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे : सय्यद हैदर शाह

आदिल शाहचे वडील, सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी संवाद साधला, ते म्हणाले माझा मुलगा काल पहलगाममध्ये काम करण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास आम्हाला तिथं हल्ला झाल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ होता. सायंकाळी 4.40 वाजता त्याचा फोन सुरु झाला मात्र त्यावेळी कुणीच उत्तर दिलं. आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा आम्हाला सय्यद आदिल हुसैन शाह याला देखील गोळी लागल्याची माहिती मिळाली. सय्यद हैदर शाह यांनी ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं म्हटलं. 

या घटनेनंतर परिसरात शोकाकूल वातावरण आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आदिल शाह यानं स्वत:ची पर्वा न करता दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचं धाडस आणि शौर्य नेहमीच लक्षात ठेवलं जाईल, असं स्थानिकांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget