एक्स्प्लोर
उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे
पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

पुणे: पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. भोसलेंसह त्यांचे जावई आणि काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाड टाकली आहे.
अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.
अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे.
अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
तसंच ही छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
