एक्स्प्लोर

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19 लाख 66 हजार घरे देणार; केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Shivraj Singh Chouhan: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

पुणे: आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते. आज भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली आहे. 

काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?

मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा आज शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. 

कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना म्हणाले,  माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

पीएम आवास योजना ग्रामीणमध्ये कोणता बदल

शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील महत्त्वाच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, लँडलाईन फोन आणि फ्रीज असेल त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ज्या कुटुंबातील एखाद्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील अर्ज करता येईल. यापूर्वी ही अट 10 हजार रुपये उत्पन्न एवढी होती. 

देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आणि चौहान यांचे आभार

तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती, ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरा आपल्याला देण्यात आलेली आहे. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घर देण्याची घोषणा आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली अत्यंत मोठी भेट आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाही, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही वीस लाख घरे मिळाल्याने अनेकांना घरे मिळणार आहेत, त्याचबरोबर पूर्वी जे निकष होते, त्यातील काही निकष हे शिथील करण्यात आले आहेत, ज्यांची नावे सुटली होती, जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येतील, पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. इतक्या संख्येने राज्याला घरे देण्याच्या निर्णयावर फडणवीसांनी मोदींचे आणि चौहान यांचे आभार मानले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi on Somnath Suryawanshi:सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली,राहुल गांधींचा थेट आरोपRahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोपSomnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Embed widget