(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manorama Khedkar Arrest: पुण्यातील बंगल्याला कुलूप अन्... मनोरमा खेडकरला महाडमधील 'त्या' हॉटेलमधून पोलिसांनी केलं अटक
Manorama Khedkar Arrest: शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
Manorama Khedkar Arrest: वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा (Manorama Khedkar) तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळावी होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनोरमा खेडकरला अटक केली आहे.
मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) ग्रामीण पोलिसांनी महाड तालुक्यातील हिरकणवाडीमधील पार्वती हॉटेल मधून अटक केली आहे. महाडमधील स्थानिक पोलिसांत नोंद करून पौड पोलिस मनोरमा खेडकरसह स्टेशनला घेऊन निघाले आहेत. त्यानंतर आता मनोरमा खेडकरवरती पोलिस कायदेशीर कारवाई करणार असल्याची शक्यता आहे.
महाडमधील हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपल्याची माहिती
गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा (Manorama Khedkar) शोध पुणे पोलिसांची पथकं घेत होती. मनोरमा खेडकरचं पाथर्डी तालूक्यातील गाव, पुण्यातील बंगल्यावर देखील मनोरमा खेडकरचा तपास घेण्यात येत होता. मात्र मनोरमा खेडकर महाडमधील हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली होती. तिथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यानंतर महाड मधील स्थानिक पोलिसात त्याची नोंद देऊन पुणे ग्रामीण पोलिस पुण्याला रवाना झाले होते. पुण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकरच्या अटकेची कारवाई पुर्ण केली जाणार आहे. त्यानंतर सखोल चौकशीला सुरूवात होणार आहे. पुणे पोलिसांनी महाड तालुक्यातील हिरकणवाडी मधील पार्वती हॉटेल मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसात नोंद करून पौड पोलिस स्टेशनला घेऊन निघाले आहेत.
मुळशीतील व्हायरल व्हिडीओनंतर पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर (Manorama Khedkar) पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं होतं. खेडकर कुटुंबाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले होते. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. आज तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमाविरुद्ध (Manorama Khedkar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता.
मनोरमा खेडकरचा (Manorama Khedkar) दुसरा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ती पोलिसांची हुज्जत घालत असताना दिसली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस मनोरमाच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यामध्ये पोहोचले होते. पण, मनोरमाने पोलिसांना बंगल्यामध्ये प्रवेश दिला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा फरार झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी तिला आज महाडमधून अटक केली असून तिला पुण्यामध्ये आणले जात आहे. आज तिला कोर्टामध्ये हजर केले जाईल.
VIDEO - महाडमधील हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपल्याची माहिती, पाहा व्हिडिओ
संबधित बातम्या - Manorama Khedkar: मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं अटक