एक्स्प्लोर
नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीची नोकराकडूनच हत्या
दिपाली कोल्हटकर पुण्यातील कर्वेनगरमधील राहत्या घरी गुरुवारी रात्री जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या.

पुणे : ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकरांची हत्या नोकरानेच केली असल्याचं समोर आलं आहे. दिपाली कोल्हटकर पुण्यातील कर्वेनगरमधील राहत्या घरी गुरुवारी रात्री जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या.
शवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळल्याने याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दिपाली यांचा खून गळा दाबून आणि डोक्यात जड वस्तूने प्रहार करून झाल्याचं शवविच्छेदनात निष्पन्न झालं होतं.
त्यांचा नोकर रोज रात्री बारापर्यंत थांबतो, पण घटनेच्या दिवशी एक तास आधीच निघून गेल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकाशी केली असता त्याने खून केल्याचं कबूल केलं.
संबंधित बातमी :
नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
