Pune Rains | पुण्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
पुण्यातील तापमान, हवामानामुळे अशा प्रकारचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दुपारी वाढलेल्या तापमानामुळे आद्रतेचं रुपांतर वेगाने ढगांमध्ये होऊन अचानक पाऊस पडत आहे.
पुणे : पुण्यात आज, उद्या आणि परवा म्हणजे 12 तारीखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल पुण्यात संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, त्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
आजपासून तीन दिवस संध्याकाळच्या वेळेत कमी वेळेत जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरपासून 16 तारखेपर्यंत पाऊस कमी होईल. मात्र त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पुण्यातील तापमान, हवामानामुळे अशा प्रकारचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुण्यात आद्रता आणि तापमान जास्त आहे. दुपारी वाढलेल्या तापमानामुळे आद्रतेचं रुपांतर वेगाने ढगांमध्ये होऊन अचानक पाऊस पडत आहे.
पुण्यात आकाशात किती किमीचे ढग आहेत, याचा मुसळधार पावसाशी संबंध नाही. त्या ढगांपैकी किती ढग हे मुसळधार पाऊस देणारे आहेत, हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ काल पुण्यावर 12 किलोमीटरचे ढग होते मात्र त्यापैकी केवळ 7 किमीचे ढगच मुसळधार पावसला कारणीभूत ठरले होते, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम काश्यपी यांची दिली.
पुण्यात काळ संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या जवळपास 50 हून अधिक घटना समोर आल्या होत्या.
पावसामुळे राज ठाकरेंची सभा रद्द
राज ठाकरेंची काल पुण्यात सभा आजोजित करण्यात आली होती. मात्र मुसळधार पावसामुळे ती सभाही रद्द करण्यात आली. राज ठाकरेंची सभा ज्या मैदानात होती, तिथे सगळीकडे चिखल झाला होता. त्यामुळे राज ठाकरेंना पहिला सभा रद्द करावी लागली होती.
संबंधित बातम्या