Harshwardhan Patil : शिरूर मावळनंतर इंदापुरात संघर्ष पेटला; धमकी देत असल्याचे म्हणत हर्षवर्धन पाटलांचं थेट शिंदे-फडणवीसांना पत्र!
तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, असे म्हटले आहे.
इंदापूर (जि. पुणे) : शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद पेटला असतानाच आता इंदापुरातही वाद टोकाला गेला आहे. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट राष्ट्रवादीवर अत्यंत गंभीर आरोप करताना जीवा धोका असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या तोंडावर पुण्यात जिल्ह्यात महायुती धगधगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीने सुद्धा काही दिवसांपूर्वीच तोफ डागली होती. त्यामुळे हा वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) March 4, 2024
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे… pic.twitter.com/aXfWNW1ZOr
काय म्हटलं आहे पत्रात?
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) March 4, 2024
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर… pic.twitter.com/GkPWDRPo42
इतर महत्वाच्या बातम्या