पुण्यात गोल्डमॅनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
सचिन शिंदे हा लोणीकंद परिसरात गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. शिक्रापूर आणि रांजणगाव एम आय डी सी भागामध्ये त्याची मागील काही वर्षांपासून दहशत होती

पुणे : पुण्यातील लोणीकंद गावात सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सचिन शिंदेवर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शिक्रापूर आणि रांजणगाव एम आय डी सी भागामध्ये त्याची मागील काही वर्षांपासून दहशत होती. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.
मंगळवारी दुपारी सचिन शिंदे लोणीकंद गावातील मुख्य रस्त्यालगत उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार करुन पळ काढला. मानेजवळ गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सचिन शिंदे हा लोणीकंद परिसरात गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिंदे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे.
संबंधित बातम्या :
अंगावर किलोभर दागिने, पण गृहोपयोगी वस्तूंसाठी पुण्यातील गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा





















