एक्स्प्लोर

पुण्यात निर्जन ठिकाणी आढळलेल्या चार महिन्यांच्या चिमुरडीची आई अखेर सापडली

पुण्यातील बावधन परिसरातील एका निर्जन ठिकाणी झाडाखाली कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत चार महिन्याची मुलगी सापडली. तिला पोलिसांनी ताब्यात घेत तिच्या पालकांची शोधाशोध केली. अखेर त्या चिमुरडीच्या वडिलांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तिला ताब्यात घेतले

पुणे : पुण्यातील बावधन परिसरात चार महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काल दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. माध्यमात बातमी आल्यानंतर अखेर सायंकाळी या बाळाच्या कुटुंबियांचा शोध अखेर लागला. सध्या ही मुलगी वडिलांच्या ताब्यात असून तिची आई मात्र बेपत्ता होती. ही आई देखील आता सापडली आहे.  मानसिक ताणतणावातून हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. तसंच रात्रभर ही चिमुरडी वारजे पुलाखाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माहितीनुसार, बावधन परिसरातील एका निर्जन ठिकाणी झाडाखाली कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत चार महिन्याची मुलगी सापडली. चांदणी चौकापासून काही अंतरावर एक पाण्याची टाकी आहे. दुपारच्या सुमारास ही चिमुरडी येथील एका झाडाखाली आढळली. रडण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे काही नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. सायंकाळी या बाळाच्या वडिलांचा शोध लागला. माध्यमात बातमी पाहिल्यानंतर बाळाच्या वडिलांनी कोथरूड पोलिसात धाव घेतली आणि ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. ही मुलगी वडिलांच्या ताब्यात दिले होते तिची आई मात्र बेपत्ता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील तुकाराम क्षीरसागर यांची ही मुलगी आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तुकाराम यांना तुमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम क्षीरसागर हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी मुलीचा ताबा घेतला. तुकाराम हे पत्नी लक्ष्मीसह एकत्र कुटुंबात राहतात. ते स्वतः फर्निचरची कामे करतात. त्यांना यापूर्वीही एक मुलगा आणि मुलगी आहे. आज दुपारी तुकाराम कामावर गेले असताना बाळाची आई लक्ष्मी क्षीरसागर ही दवाखान्यात जाते असे सांगून घराबाहेर पडली ती परतली नव्हती. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण सापडली नाही. दरम्यान आज बाळाची बातमी पाहून तुकाराम यांना धक्काच बसला. त्यांनी कोथरूड पोलिसात धाव घेत ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. तुकाराम क्षीरसागर यांनी सांगितल्यानुसार, घरात भांडणं नाही, काही नाही तरीही पत्नीने असे का केले हे माहीत नाही. पोलिसांनी या बाळाला वडिलांच्या ताब्यात सोपवले असून आईचा शोध सुरू होते. अखेर आज आईदेखील सापडली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission: राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
Kim Jong Un Viral Video: DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission: राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
Kim Jong Un Viral Video: DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
Horoscope Today 7 September 2025: आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
Bihar Election : बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
Embed widget