पुणे : सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनेवर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना याकडे लक्ष देण्याचा आग्रह केला. ते म्हणाले सरकार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देतं. पण बँका शेतकऱ्यांकडून आधी व्याज वसूल करतात, अन जेव्हा सरकार परतावा देईल तेव्हा ते शेतकऱ्यांना देतात. बँका ते कधी परत करतात तर अनेकदा देतही नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणून माझा आग्रह आहे की गडकरी आपल्याला जी मोफत तीन लाखांपर्यंतची मदत द्यायची आहे, ती बँकांनी मुदतीच्या आत शिवाय तीन लाखच वसूल करायला हवे. तरच शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचं खऱ्या अर्थाने उपयोग होईल, असं बागडेंनी नमूद केलं.

Continues below advertisement



हरिभाऊ बागडेंचा सन्मान
साखर कारखाना आणि वर्तमानपत्र तेच सुरू करतात. ज्यांनी गेल्या जन्मी काही तरी पाप केलेलं असतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. पुण्याच्या आळंदीत सहकार भारतीच्या अकराव्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा सन्मानित करण्यात आलं. तेंव्हा गडकरींनी बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या अवास्तव व्याजावर बोट ठेवलं. डॉलर वर डोक्यावरून पाणी गेलं तरी 4 टक्केच व्याज घेतले जाते पण भारतात 12 टक्के, 13 टक्केपेक्षा ही जास्त व्याज आकारले जाते. हे खूप व्याज होतं, यासाठी कुठंतरी सांगड घालायला हवी. असं गडकरी म्हणाले.



दोन्ही पालखी मार्गाचे भूमीपूजन याच महिन्यात
बहुप्रतिक्षेत असलेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही मार्गाचे भूमीपूजन याच महिन्यात होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. यासाठी बारा हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. हे सांगताना गडकरींनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने एक एकरचा भाव अठरा कोटी केला होता. इतका कुठं भाव असतो का? असा प्रश्न उपस्थित केला.