अहमदनगर: नुकताच अहमदनगरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार (sharad pawar) आणि नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी उपस्थिती लावली. नितीन गडकरी यांनी या महामार्गाबद्दल माहिती देत इथेनॉल उत्पादन वाढीबद्दल सांगितले. इथेनॉलच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे असे मतं नितीन गडकरी यांनी भूमिपूजन सोहळ्यावेळी मांडले. ते म्हणाले, 'आता इथेनॉल उत्पादन वाढवलं पाहिजे. जेवढं इथेनॉल तयार करतील ठेवलं भारत सरकार खरेदी करेल. 100 टक्के वाहतूक इथेनॉलवर झाली. पाहिजे इथेनॉल 65 रुपये लिटर आहे. सगळ्या साखरकारखान्यांनी इथेनॉल पंप सुरू केला पाहिजेत. देशात नवीन साखर कारखाने सुरू करण्यास बंदी घातली पाहिजे. साखर, गहू ,तांदूळ उतपादन अधिक होत आहे.


Nitin Gadkari : 'पुणे-बंगळुरू यापुढे पाण्यात जाणार नाही', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन


नितीन गडकरी म्हणाले, 'उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की, मी इथेनॉलच्याच गाडीत बसेन. दिल्ली-मुंबई रस्त्यावर ट्रायल घेतली 170 किमीनी गाडी चालवली पण पोटच पाणी हलाल नाही. रस्त्याच्या बाजूला जर सरकारी जागा असतील तर त्यावर इंडस्ट्रीयल कलस्टर ,लॉजीस्टिक सुविधा स्वखर्चाने द्यायला तयार. शिर्डी विमानतळाच्या बाजुला नवी सिटी करण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय चांगला आहे.' यावेळी  सुरत, नाशिक आणि अहमदनगर येथे ग्रीन फिल्ड वे या नव्या रस्त्याची गडकरी यांनी घोषणा केली.


'स्टिंग ऑपरेशनमध्ये चेहरे समोर आलेल्या क्लिनअप मार्शल्सवर गुन्हा दाखल होणार' : Kishori Pednekar


 
पुढे ते म्हणाले, '18 कोटी रुपये एका एक्कर मावेजा आला त्यावेळी आमच्या अधिकारी यांनी महाराष्ट्रात नवीन रस्ते करायचे नाहीत असा निर्णय घेतला होता. मी महसूलमंत्री यांना ही बोललो सगळे आमदार मला पत्र देतात. मला प्रश्न पडतो की, मी महाराष्ट्राचा pwd मिनिस्टर आहे की काय? आता 12 कोटी महाराष्ट्रात पैसे दिले 200 कोटी प्रत्येकी सेना ,भाजप, काँग्रेसला दिले आणि 600 कोटी  फडणवीस यांना दिले.'