अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज पवार आणि गडकरी एकाच मंचावर होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो.  देशाच्या कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते पहायला मिळतात. तिथं लोकं सांगतात ही गडकरी यांची कृपा आहे, अशा शब्दात  शरद पवार यांनी गडकरींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

गडकरी व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहेत ते पाहात नाहीतशरद पवार म्हणाले की, रस्ते वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी म्हहत्वाची असते. गडकरी यांनी जबाबदारी घेण्यापूर्वी 5 हजार किमी रस्ते होते ते आता 12 हजार किमीच्या पुढे गेले आहेत. संसदेमध्ये गडकरी आलेला व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहेत ते पाहात नाहीत विकास कामं पाहतात, असं शरद पवार म्हणाले. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असं शरद पवार यावेळी म्हणाले. लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.  

इथेनॉल असलेल्या गाडीतच बसेल अशी प्रतिज्ञा केली पाहिजे : नितीन गडकरी

गडकरी पक्ष नव्हे, विकासकाम बघतातदरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणतात. “संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार म्हणाले की,  साखर आव्हानात्मक परिस्थिती लवकर येईल असं मला वाटते.  अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं. आधार देणार पीक ऊस आहे. पुढील दोन वर्षे भूगर्भातील पाणी चांगलं राहिल त्यामुळे एकच पीक शेतकरी घेतील. त्यामुळे उसातून साखर एके साखर हे कमी करावे लागेल इथेनॉलकडे जावं लागेल. हायड्रोजन गॅस हे इथेनॉलच्या पुढची स्टेप आहे, असंही पवार म्हणाले.