Sunetra Pawar met Nanasaheb Navale : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. सुनेत्रा पवार ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले (Nanasaheb Navale) हे त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. ताथवडे येथे सुनेत्रा पवार आणि नानासाहेब नवले यांची भेट झाली. 


सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांच्या घरात पाय ठेवताच "यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ, असे म्हणत माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवारांची प्रशंसा केली. तर सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांना नमस्कार करून त्या कंप्लिमेंटचा विनम्रपणे निशब्दपणे स्वीकार केला.


शरद पवारांच्या सुनेवरील वक्तव्यावरून महाराष्ट्रात मोठी खळबळ 


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली होती. अजित पवार (Ajit pawar) गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 


तू सर्वात बेस्ट सून आहेस - नानासाहेब नवले 


आता शरद पवार यांचेच एकेकाळचे सहकारी आणि नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांना, "तू सर्वात बेस्ट सून आहेस, असे म्हटले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून सुनेत्रा पवारांना जेवणही करायला लावले. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


नानासाहेब नवलेंनी दिला होता सुनेत्रा पवारांना पाठींबा


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी नानासाहेब नवले यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना जाहीर केला होता. आता तू सर्वात चांगली सून आहेस, असे म्हणत माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांची प्रशंसा केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar: बारामतीत दगाफटका झाला, सुनेत्रा पवार हरल्या तर तुमचं राजकीय करिअर धोक्यात येईल? अजित पवार म्हणाले...


Sunetra Pawar : पुरंदरमध्ये महायुतीचे नेते एकवटले; विजय शिवतारे, जय पवारांच्या संयुक्त दौऱ्याला सुरुवात