मुंबई 2019 च्या   लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)   अजित पवार (Ajit Pawar)  यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar)  यांचा  दारु पराभव झाला  होता.  यंदाची निवडणूक  ही पवार कुटुंबासाठी  अत्यंत  प्रतिष्ठेची लढत आहे. कारण  पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात  उतरल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. त्याबरोबरच राष्ट्रवादीच्या बंडानंतर होणारी ही पहिली निवडणून असून   अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.  निवडणुकीत जर काही दगाफटका झाला   तर  अजित पवारांचे करिअर धोक्यात येईल? यावर अजित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना उत्तर दिले आहे.


अजित पवार म्हणाले , जोपर्यंत सामान्य माणूस, मतदार माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकत नाही. मी काम करणारा माणूस आहे. मी काम करतो हे लोकांना माहिती आहे, मी शब्दाचा  पक्का आहे, हे देखील लोकांना माहिती आहे. मी जी गोष्ट हातात घेतो तडीस नेतो, आजपर्यंत मी कोणाचे नुकसान केले नाही हे लोकांना माहिती आहे. माझे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल करत असतो.  त्यामुळे  माझ्यासोबत जोपर्यंत  जनता आहे तोपर्यंत माझ्या कारकीर्दीला कोणताही धोका नाही. 


सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली? अजित पवार म्हणाले... 


सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर बोलताना अजित पवार म्हणाले,  बारामतीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत असताना अनेक नावं पुढे आली.  सुनेत्रा पवारांना चांगला अनुभव आहे त्यांनी अनेक समाजकार्य केले आहे गावक-यांसोबत चांगलं ट्युनिंग चांगला आहे. 
बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आले तर तो अधिक जलद गतीनं करता येईल. केंद्रात जाणारा खासदार हा सत्ताधारी विचारांचा गेला तर कामं जास्त करता येतात मतदारसंघातला विकास वेगानं होतं. केंद्रातून रेल्वे, रोड यांच्यासाठी लागणारा निधी व्यवस्थित येतो.   सत्ताधारी पक्षाचा उमेदवार जिंकला तर काम जास्त होतात.  विविध कर्ज पाहिजे असतील तर केंद्रामार्फत जावं लागतं.  


हे ही वाचा :


उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात असताना आमची अमित शाहांशी चर्चा सुरु होती; अजितदादांकडून त्या गुपिताचा पुनरुच्चार