Pune Crime News: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकाला अटक; 2 कोटीची मागितली लाच, पहिला हफ्ता घेताना सापडला जाळ्यात, घराच्या झाडाझडतीत...
Pune Crime News: लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरी सापडली ५१ लाखांची रोकड सापडली आहे. त्याचबरोबर दागिन्यांसह मालमत्तेची कागदपत्रे एसीबीने जप्त केली आहेत.

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाला (EOW police officer demands bribe) तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी (२ नोव्हेंबर) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात (EOW police officer demands bribe) एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी; मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. चिंतामणी हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची लाच मागितली होती, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे. (EOW police officer demands bribe)
Pune Crime News: २ कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली
एसीबीच्या पथकाने सापळा रचून रविवारी प्रमोद चिंतामणी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. त्यानंतर काल (सोमवारी ३ नोव्हेंबर) त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या तपासादरम्यान ५१ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याचे माहिती समोर आली आहे. या पैशांसह दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबीने जप्त केली आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांची देखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी याने २ कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pune Crime News: घराच्या झाडाझडतीत मिळालेल्या रोख रकमेसह अन्य कागदपत्र
काल (सोमवारी, ता ४) रोजी त्याच्या घराच्या झाडाझडतीत मिळालेल्या रोख रकमेसह अन्य कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. एखाद्या पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात एवढी मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंतामणी याने लाचेची मागणी करताना १ कोटी त्याच्यासाठी व १ कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी मागितले होते, त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील मोठ्या शहरांमधील आर्थिक गुन्हे शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचे गुन्हे तपासाधीन असतात. मात्र, कागदपत्रे गुंतागुंतीची असल्याचे कारण देत अनेकदा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जाते. काही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदविल्यानंतरही आरोपींवर कारवाई करताना फिर्यादींना विविध मार्गांनी त्रास दिला जातो, अशीही तक्रार वारंवार पुढे येत असते. आरोपींना सूट देण्याच्या किंवा तपासात सवलत देण्याच्या नावाखाली मोठ्या रकमा मागितल्या जातात, असा आरोपही अनेकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्यावरील लाच प्रकरणातील कारवाईमुळे या आरोपांतील सत्यता उघड झाली आहे, असे सांगितले जात आहे.
























