एक्स्प्लोर

Pune DSK Bail News: मोठी बातमी! बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर; काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Pune DSK Bail News:   पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे.  डी एस के आणि त्यांच्या  पत्नींवर त्यांच्याकडे फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल महाराष्ट्र फ्लॅट ओनर एक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.  मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नी मागील काही फेब्रुवारी 2018 पासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात कैद आहेत.

वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह त्यांचे कनिष्ठ अॅड. रितेश येवलेकर यांनी 13/08/2016 रोजी सिंहगड पोलीस स्टेशन, पुणे येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये श्री. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी श्रीमती हेमंती दीपक कुलकर्णी यांची बाजू मांडली. श्री कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना देण्यात ते जाणूनबुजून अयशस्वी ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात कुलकर्णींना 05/03/2019 रोजी अटक करण्यात आली होती आणि ते 17/02/2018 पासून मुख्य FIR संदर्भात न्यायालयीन कोठडीत होते.

लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अॅड आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड रितेश येवलेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. जो जाहीर करताना हायकोर्टानं डीएसकेंना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget