Wine : राजभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. विरोधकांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. सुपर मार्केटमधून वाईन विक्री करण्याच्या निर्णयातून आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. 


अमृता फडणवीस लोणवळा येथे माध्यमांशी बोलत होत्या. अमृता फडणवीस म्हणाल्या, "वाईन ही दारूच असून लहान मूले आणि महिला सुपर मार्केटमध्ये जात असतात. त्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवणं अयोग्य आहे. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला. 


परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी काल राज्यातील विविध भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावर बोलातना अमृता फडणवीस म्हणाल्या, "राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकार मधील निम्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे? हे माहीत नसतं. मंत्रालयाच्या सर्वच विभागात नुसती धांदल सुरू आहे.  


"राज्यभरातील विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते केवळ मूठभर लोकांसाठी झटत आहेत, असा टोला अमृता फडणवीस यांनी यावेळी लगावला.  


महत्वाच्या बातम्या