Wine : राजभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. नागपूरमधील चिल्लर किराणा व्यापारी संघटनेनेही दुकानातून वाईनची विक्री करण्यास विरोध केला आहे. 


"सामाजिक हित लक्षात घेऊन आम्ही आमच्या दुकानातून वाईन विक्री करणार नाही असा निर्णय एकमताने घेतल्याची  माहिती नागपूर किराणा व्यापारी संघटनेचे सचिव ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी दिली. 


"राज्यातील तरुण वर्ग रोजगार मागत असताना त्यांना तुम्ही किराणा दुकान उघडा आणि तेथून वाईन विक्री करा, असा रोजगार उपलब्ध करून देणे चूक असल्याचे मत रक्षक यांनी व्यक्त केले. 


नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघटनेचे शहरात सुमारे पाच हजार सदस्य असून सुमारे एक हजार दुकानं 1000 वर्ग फुटापेक्षा जास्त आकाराची आहेत. या सर्व मोठ्या किराणा दुकानांतून वाईन विक्री केली जाणार नाही असा निर्णय संघटनेने घेतला आहे.  


दरम्यान, किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय योग्य नसल्याचे बहुतांशी ग्राहकांनीही म्हटले आहे. किराणा दुकानातून वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असं ग्राहकांचं मत आहे. किराणा दुकानात वाईन विक्री सुरू झाल्यास महिलांचं दुकानात येणं कठीण होईल. त्यामुळे नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघटनेने घेतलेला  किराणा दुकानातून वाईन विक्री न करण्याचा निर्णय योग्यच आहे असं मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केले आहे. 


महत्वाच्या बातम्या