नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या विशेष सभेत नगरसेवक सिगारेट ओढत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या काल पार पडलेल्या ऑनलाइन विशेष सभेत ही घटना घडली. 


नागपूर मधील कचऱ्याचा प्रश्‍न तसेच कचरा संकलन करणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या कारभारासंदर्भात महापालिकेची विशेष ऑनलाइन सभा बोलवण्यात आली होती. या ऑनलाईन सभेत कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या कारभारासंदर्भात चौकशी समितीचा अहवाल मांडला गेला. त्यानंतर अहवालावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळाले. 


रमेश पुणेकर या सभेसाठी नाईक तलाव परिसरातील त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन सहभागी झाले होते. सभा सुरू असताना रमेश पुणेकर सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात चित्रित झाले. 


धुम्रपान कुठे आणि केव्हा करायचे याचे काही नियम आहेत. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीने ऑनलाइन सभा सुरू असताना असे वर्तन करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता नागपुरात विचारला जात आहे. दरम्यान, रमेश पुणेकर या आधीही अनेक वादात सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी नागपूर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली असताना रमेश पुणेकर त्या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले होते. 


"ऑनलाइन सभेत माझा कॅमेरा सुरू आहे, हे लक्षात नव्हते. त्यामुळे ही चूक झाल्याची प्रतिक्रीया पुणेकर यांनी फोनवरून दिली आहे. 


Nagpur : नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन बैठकीत चर्चा काँग्रेस नगरसेवकाचे सिगरेटचे झुरके? ABP Majha



महत्वाच्या बातम्या