(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puja Khedkar: अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात गेलेल्या पूजा खेडकरला दिलासा नाहीच; सुनावणी ढककली पुढे
Puja Khedkar: बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली आहे, आता 12 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Puja Khedkar: बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाची नवीन तारीख दिली आहे. आता ही सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. आज 11.30 वाजता दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं 1 ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
माजी ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) याचिकेवरील सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 12 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. त्यात तिचा अटकपूर्व जामीन फेटाळणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी तिने स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त प्रयत्न केल्याबद्दल पूजाने नावं बददली
शुक्रवारी न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी पुन्हा ठेवण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गेल्या आठवड्यात तिची याचिका फेटाळल्यानंतर खेडकरनी (Puja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये असे आढळून आले की नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त प्रयत्नांसाठी खोटी ओळख पटवण्याशी संबंधित आरोप आहेत. ट्रायल कोर्टाचे न्यायमूर्ती याबाबत म्हणाले की, संपूर्ण घटनेचा उलगडा करण्यासाठी आणि यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा सहभाग निश्चित करण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे.
UPSC ने आपल्या दाव्याला समर्थन देण्यासाठी विविध कागदपत्रे केली तयार
अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जांगला यांनी सांगितले की, सध्याची वस्तुस्थिती आणि परिस्थितीत आरोपीच्या बाजूने अटकपूर्व जामिनाच्या विवेकाधिकाराचा वापर करणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे. न्यायालयाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात, अर्जदार/आरोपींवर कलम 420/468/471/120B IPC आणि 66D IT कायदा आणि 89/91 राइट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज कायदा, 2016 नुसार दंडनीय गुन्ह्यासाठी आरोप ठेवण्यात आले आहेत. अर्जदार/आरोपीनी चुकीची माहिती देऊन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. पूजा खेडकर विरोधात तक्रारदार/UPSC ने त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी विविध कागदपत्रे तयार केली आहेत. हा कट पूर्वनियोजित पद्धतीने रचण्यात आला आहे हे देखील सांगण्यात आले आहे.
सध्याचे प्रकरण हे केवळ हिमनगाचे टोक असू शकते कारण जर अर्जदार/आरोपी तक्रारदार तपास यंत्रणेचे उल्लंघन करू शकतात, तर इतर का नाही. त्यामुळे उमेदवार आणि सामान्य जनतेची प्रतिष्ठा, निष्पक्षता, पावित्र्य आणि विश्वास अबाधित राखण्यासाठी, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तक्रारदाराने त्यांच्या SOPs मजबूत करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पूजा खेडकरचं आयएएस पद रद्द
मात्र पूजा खेडकरने (Puja Khedkar) ट्रेनी असताना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टींसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.आपल्या मुलीला हवं ते मिळावं म्हणून वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली. त्यात आता तिचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आले आहे.