(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Darshana Pawar Murder case : गावातील घराला कुलूप, दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे नेमका कुठे आहे? शहा गावकऱ्यांनी दिली महत्वाची माहिती...
Darshana Pawar Murder case : राहुलला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक थेट नाशिक जिल्ह्यातील शहा गावात पोहचलं आहे. मात्र राहुलच्या घराला कुलूप आहे.
Darshana Pawar Murder case : MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला मृतदेह सापडला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिची हत्या झाल्याचं पोस्टमार्टमधून समोर आलं. या प्रकरणात दर्शनाचा मित्र राहुल हांडोरेवर पोलिसांचा संशय आहे. त्यालाच शोधण्यासाठी पोलिसांचं पथक थेट नाशिक जिल्ह्यातील शहा गावात पोहचलं आहे. मात्र राहुलच्या घराला कुलूप आहे. त्याचं कुटुंबीयदेखील गावात नाही आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून कुटुंबीय गावात नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र पोलीस राहुलचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाह गावाचा आहे. त्याने BSC चं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दोघांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. याच ओळखीतून दोघेही ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली. 9 तारखेला हे दोघं ट्रेकिंगला गेले होते. मात्र दोन ते तीन दिवस दोघांचा पत्ता न लागल्याने अखेल राहुलच्या कुटुंबियांनी 12 जूनला पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
राहुलचे वडिल पेपर विक्रेते...
शहा गावात राहुलचे वडिल पेपर विक्रेते आहे आणि त्याची आई गृहिणी आहे. मागील अनेक वर्षांपासून राहुल बाहेरगावी शिकत असल्याने गावात त्याच्याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र कुटुंबीय गावात राहत असल्याने सुट्ट्यांसाठी राहुल शहा गावात यायचा तेवढाच गावकऱ्यांशी त्याचा संपर्क व्हायचा, असं गावकरी सांगतात. त्यामुळे शहामध्येही राहुलबाबत अधिक माहिती मिळत नाही आहे.
लहानपणापासून राहुल आणि दर्शना एकमेकांना ओळखत होते का?
राहुलच्या घरासमोर दर्शनाचे नातेवाईक राहत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लहानपणापासून राहुल आणि दर्शना एकमेकांना ओळखत होते का?, त्यांच्या मैत्रीपलीकडे कोणतं नातं होतं का?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. त्यासंदर्भात आता पोलिसांची टीम सिन्नर मधील शाह गावात पोहचली आहे आणि तपास करत आहे. राहुल हांडोरेचा फोन बंद आहे. दुसऱ्या राज्यात त्याचं लोकेशन आढळलं आहे. त्याने फोन सुरु केल्यावर तो कोणत्या भागात आहे, हे स्पष्ट होईल, यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली गेली आहे. वेगवेगळ्या राज्यात आणि त्याच्या गावात ही पथकं राहुलचा शोध घेत आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
संबंधित बातमी-