एक्स्प्लोर
'दादा मी प्रेग्नंट आहे', मुंबईसह पुण्यात होर्डिंगची चर्चा
दादरमधील 'दादा मी प्रेग्नेंट आहे' या नावाचं होर्डिंग चांगलं गाजताना दिसत आहे. हे होर्डिंग केवळ दादरमध्येच नाही तर पुण्यातील कर्वेरोडच्या डेक्कन टी पॉईंट येथेही असेच होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे.
मुंबई / पुणे : काही दिवसांपूर्वी पिंपरीतील 'शिवडे आय अॅम सॉरी' होर्डिंगची प्रचंड चर्चा झाली होती. आता असेच काही होर्डींग मुंबई-पुण्यात झळकले आहेत. यामध्ये दादरमधील 'दादा मी प्रेग्नेंट आहे' या नावाचं होर्डिंग चांगलं गाजताना दिसत आहे. हे होर्डींग केवळ दादरमध्येच नाही तर पुण्यातील कर्वेरोडच्या डेक्कन टी पॉईंट येथेही असेच होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे.
हे होर्डिंग एखाद्या नाटकाचं किंवा चित्रपटाच्या प्रमोशनचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या होर्डिंगमागील उद्देश स्पष्ट होत नसल्यामुळे नागरिकांची उत्सुकता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी रणवीर सिंगचे देखील 'कार्ड मिला क्या' नावाने होर्डिंग लागले होते. त्याचीही प्रचंड चर्चा झाली होती. ते एक व्यावसायिक होर्डिंग होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement