(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Pune Crime: मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे: सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. काल(गुरूवारी) स्कुलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी नराधम पसार झाले. त्यानंतर तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. (Pune Crime News)
पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार
पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आला आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)
पंकज देवेंद्र ठाकूर वय ३५ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षापासुन तो मुलीला चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे.
पुण्यात आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार
स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय.