पुणे : शाळेत असताना सतत मारहाण करणाऱ्या तरुणाला लक्षात ठेवून तब्बल सोळा वर्षांनी त्याला भर रस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विकी शिरतर व त्याचा अनाेळखी मित्र यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध परिसरातील एम्स हाॅस्पिटल समाेर हा प्रकार घडला. यबााबत अमाेल अंकुश कांबळे (वय-33 वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी विकी आणि अमोल कांबळे हे लहान असताना म्हणजेच 16 वर्षांपूर्वी शाळेत एकत्र होते. यावेळी अमोल कांबळे हा विकीला मारहाण करायचा आणि शाळेत होत असणारी मारहाण विकी मात्र विसरला नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा अमोल कांबळे त्याला दिसला तेव्हा त्याला शाळेत होणारी मारहाण आठवली. त्यानंतर त्याने एका साथीदाराला बोलावून घेतले आणि शाळेत असताना तू मला मारायचास आठवतं का, असं म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
विकीने अमोलला लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विकीचा डोळा काळा निळा झाला. पाठीवर वळ उठले तर हाताची काही बोट देखील फॅक्चर झाली. रस्त्यावर मारहाण झाल्यानंतर विकीने पुन्हा एकदा घरामध्ये बसून त्याला आणखी मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर अमोलला मात्र प्रचंड धक्का बसला. कारण शाळेत असताना असा काही प्रकार झाला आहे त्याला आठवत देखील नाही. अमोल आज 33 वर्षाचा आहे त्याचा 15 वर्षीय मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेतो.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या अमोलने पोलीस स्टेशन गाठत आपल्यासोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितले. या सर्व प्रकारानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.