पंढरपूर : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत विविध ठिकाणी तिच्यावर सात दिवस तलवारीचा धाक दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांकडून मात्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उभं करण्यास सुरुवात झाली आहे. 


पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीस त्याच परिसरात राहणाऱ्या विकास माउली जाधव याने फूस लावून पळवून नेलं होतं. या तरुणास तक्रार दाखल झाल्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी अटक  करून त्याच्यावर अपहरण, बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे.  या आरोपीस न्यायालयासमोर उभं केलं होतं. पुढच्या तपासासाठी न्यायालयाने आरोपीला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचंही कदम यांनी सांगितले आहे. 


Kalyan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सात वर्षानंतर वाचा फुटली, आरोपीवर गुन्हा दाखल
  
या प्रकरणात कुटुंबाचा दाखल देत आता काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बहुजन समाजातील या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने तिला महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाडीतून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला मदत करणाऱ्या सर्वांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील हस्तक्षेप करीत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


Pune Crime : शॉर्टफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल


या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने हातात तालावर घेतलेला फोटो मुलीच्या नातेवाईकांना पाठवले होते. या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे , ही केस जलदगती न्यायालयात चालवावी आणि या मुलींसाठी राज्यातील चांगल्यात चांगला वकील देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हळणवर आणि सुभाष म्हस्के यांनी केली आहे. पोलिसांनी मात्र या प्रकारात सरकारी गाडी वापरल्याचा आरोप धुडकावून लावीत आत्तापर्यंत तपासात असे पुढे आले नसल्याचे सांगितले आहे. 
दरम्यान, या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी पोलीस करीत असून यात दोषी आढळणाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल केला जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा पंढरपुरात गुंडगिरीच्या दहशतीवर होत असलेले गैरप्रकार समोर आले आहेत. या घटनेबाबत गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या सामाजिक संघटनांनी केली आहे. 


शाळेच्या समोर झालेल्या मारामारीत विद्यार्थ्याने केला मित्राचा खून