एक्स्प्लोर
दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात थोड्याच वेळापूर्वी तावडेला हजर करण्यात आलं. यावेळी तावडेनं अटकेनंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार न्यायाधीशांकडे केली. 20 ऑगस्ट 2013ला डॉ. सकाळी सात वाजता डॉ. दाभोलकर यांची पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या हत्येनंतर तब्बल पावणेतीन वर्षांनी काल पहिल्यांदा पोलिसांनी पहिली अटक केली. डॉ. वीरेंद्र तावडे हा सनातन संस्थेचा साधक आहे. गेल्याच आठवड्यात सीबीआयनं त्याच्या पनवेलमधील घरीही धाड टाकली होती. तसंच त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावलं होतं. काल पोलिसांनी वीरेंद्र तावडे याला नवी मुंबईतून अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement