एक्स्प्लोर
Advertisement
डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.
पुणे : आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकेंना हा मोठा धक्का बसला आहे.
न्यायलयाच्या या निर्णयानंतर पोलीस डीएसकेंना अटक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मंगळवारपर्यंत डीएसकेंच्या अटकपू्र्व जामीनावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरु होता. त्यामुळे आज अगदी पाच मिनिटांच्या आत या जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता पोलिस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने डीएसके अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.
मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.
२०१४ पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.
स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.
सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.
इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे.
अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.
सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.
मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली
डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात.
आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.
संबंधित बातम्या :
अखेर डीएसकेंच्या घरी पोलीस पोहोचले!
डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला
डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement