एक्स्प्लोर
Cosmos Bank Cyber Fraud : पुणे पोलिसांचं यश, 5 कोटी 73 लाख परत मिळवले!
ऑगस्ट 2018 मध्ये पुण्यातील कॉसमॉस बँकेतून 94 कोटी रुपये परदेशातील विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले होते. त्यापैकी हँग सेंग बँकेत ट्रान्सफर केलेल्या 13 कोटी 50 लाखांपैकी सुमारे पावणे सहा कोटी रुपये पहिल्या टप्प्यात परत मिळाले आहेत.
पुणे : कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. हाँगकाँगमधील हँग सेंग बँकेने गोठवलेल्या रकमेपैकी 5 कोटी 72 लाख 95 हजार 87 रुपये पहिल्या टप्प्यात परत केले आहेत. पुण्यातील कॉसमॉस बँकेवर ऑगस्ट 2018 मध्ये सायबर हल्ला झाला होता. यात चोरट्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर हल्ला करत 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले होते. दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची रक्कम मिळवण्यात पुणे सायबर पोलिसांना यश आलं आहे.
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंकेचे मुख्यालय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सायबर चोरट्यांनी याच बँकेच्या एटीएम स्वीचवर ऑगस्ट 2018 रोजी मालवेअर हल्ला केला होता. 11आणि 13 ऑगस्ट 2018 रोजी कॉसमॉस बँकेतून 94 कोटी रुपये परदेशातील विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले. त्यासाठी मालवेअरच्या सहाय्याने आभासी स्विचिंग सिस्टीम तयार करण्यात आली. या आभासी स्विचिंग सिस्टीमने कॉसमॉस बँकेच्या ऑनलाईन सिस्टीमला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मागितली आणि कॉसमॉसच्या सिस्टीमने ती दिल्यानंतर पैसे बाहेरच्या देशांमध्ये वळते करण्यात आले. या सायबर हल्ल्यात खातेदारांची बनावट डेबिट आणि व्हिसा कार्ड तयार करण्यात आली. ती वापरुन 21 देशात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढले. प्रत्यक्षात खऱ्या डेबिट आणि व्हिसा कार्डचा वापर झाला नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हँग सेंग बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे 13 कोटी 50 लाख ट्रान्सफर करण्यात आले. त्यात त्यांनी 94 कोटी 42 ला18१८ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला होता.
सायबर पोलिसांनी तात्काळ हेनसेंग बँक आणि हाँगकाँग पोलिसांशी संपर्क साधून कॉसमॉस बँकेतर्फे तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. बँकांमध्ये असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम आणण्यासाठीही पोलिसांकडून पाठपुरावा सुरु होता. हेनसेंग बँकेतील ज्यात एएलएम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते, ती रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी बँक, न्यायालय आणि तिथल्या सरकारशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर 10 कोटी रुपये गोठवण्यात आले होते. ही रक्कम परत मिळावी, यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते.
दरम्यान हाँगकाँगमधील न्यायालयात सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात कॉसमॉस बँकेच्या खात्यात 5 कोटी 73 लाख रुपये पैसे जमा झाले आहेत. अशाप्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातून परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement