Coronavirus | पुण्यात रात्रभरात 55 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1319
पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या काल 1264 होती. मात्र त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 55 ने वाढली. त्यामुळे आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1319 वर पोहोचली आहे.
पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि पुणेकर यांच्या चिंतेची भर टाकणारी बाब समोर येत आहेत. कारण रात्रभरात पुण्यात आणखी 55 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या 12 तासात 1319 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 77 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर 206 रुग्ण बरे झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात काल दिवभरात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1264 झाली होती. मात्र त्यानंतर रात्रभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 55 ने वाढली. त्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1319 वर पोहोचली आहे.
दिलासादायक! आज कोरोना बाधितांची वाढ निम्म्याने घटली; दिवसभरात 440 नवीन रुग्णांची नोंद
पुणे जिल्ह्यातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण हे शहरातील आहेत. तसंच आता नव्याने नोंद झालेले कोरोनाबाधित हे हडपसर, भवानीपेठ, कसबा पेठ, येरवडा या क्षेत्रातील आहे. एकमेकांच्या संपर्कातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. कारण इथे बैठी घरं तसंच झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य होत नाही. मागील आठवड्यात महापालिकेने इथल्या लोकांची सोय मनपा शाळांमध्ये केली होती.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आठ हजारांच्या पार गेली आहे. त्यात मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.
Coronavirus | पुणे जिल्ह्यात रात्रभरात 55 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद