पुणे : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना लसीकरण मात्र अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर सरसकट सगळ्यांसाठी लसीकरण सुरु करण्याची मागणी जेष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा  यांनी केलीय . लसीकरणाचा वेग वाढवणं हाच कोरोनावर मात करण्यासाठीचा एकमेव उपाय असल्याची प्रतिक्रिया लहान-मोठे सर्वच व्यवसायिक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीचा तुटवडा जाणवत असताना केंद्र सरकारने या लसीचे आतापर्यंत  फक्त पाच कोटी डोसच खरेदी केल्याचं समोर आलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून इतर देशांना आतापर्यंत सहा कोटी डोस पुरवण्यात आले असताना जिथं ही लस तयार होतेय त्या भारतात या लसीचा तुटवडा का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

भारतात लसीकरणाला सुरुवात झाली 16 जानेवारील. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये फक्त  तीन कोटी लोकांनाच कोरोनाची लस टोचण्यात यश आलं. 130 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात याच गतीनं लसीकरण होत राहिलं तर देशातील सर्व नागरिकांना लस टोचायला काही वर्षं लागणार आहेत. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट आल्याने काही शहरांमध्ये लोकडाऊन करण्यात आला. तर अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आलेत. त्यामुळे कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर सरसरकट सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्याची मागणी होऊ लागलीय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी तसं ट्वीट करून या चर्चेला सुरुवात करून दिलीय. देशातील लहान मोठ्या उद्योजकांना पुन्हा लॉकडाऊन होणं परवडणारं नसल्याने त्यांच्याकडूनही या मागणीचा रेटा वाढणार आहे.

Anand Mahindra | पहिल्यांदा गरजूंना कोरोनाची लस द्यावी, आनंद महिंद्रा यांचं राज्य सरकारला आवाहन 

- भारतात आतापर्यंत  देण्यात आलेल्या तीन कोटी लसींपैकी सर्वाधिक 22 लाख 75 हजार डोस महाराष्ट्रात देण्यात आलेत . - त्यानंतर 22 लाख 58 हजार डोस राजस्थानमध्ये देण्यात आलेत. - त्याखालोखाल 19 लाख 40 हजार डोस पाश्चिम बंगालमध्ये देण्यात आलेत. - तर त्यांनतर 18 लाख 71 हजार डोस देणाऱ्या गुजरातचा नंबर आहे . - पण लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनावरील लस देण्यामध्ये देशात केरळ आघाडीवर आहे . - त्यानंतर कर्नाटक , दिल्ली , मध्य प्रदेश , महाराष्ट्र , तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक आहे.

Coronavirus  | 'मोदी ऑन अॅक्शन मोड', कोरोनाच्या स्थितीवर आज 11 वाजता मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार 

पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि  टप्प्यात  फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यास सुरुवात झाली. तर दुसऱ्या टप्प्यात 60 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि कोमॉरबीडीटी म्हणजे व्याधिग्रस्त असलेल्या 45 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना लस देण्यास सुरुवात झालीय. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु असलेल्या या लसीकरणं केंद्रांवर एका दिवशी जास्तीत जास्त शंभर व्यक्तींनाच लस दिली जातेय. हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. कोरोनावरील लस सरसकट उपलब्ध करून दिल्यास 500 रुपयांना दोन डोस घ्यायलाही लोक तयार आहेत.

Dilip Gandhi : माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये होते मंत्री 

सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हीशील्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन अशा दोन लसींचे डोस लोकांना देण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी कोव्हीशील्ड लसीचा तुटवडा असल्याची ओरड होतेय. कोव्हीशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटकडून जगातील अनेक देशांना आतापर्यंत कोव्हीशील्ड लसीचे 6 कोटी डोस पुरवण्यात आलेत. मात्र खुद्द भारतात या लसीचे फक्त 5 कोटी डोस सरकारने ऑर्डर केलेत तर एक कोटी डोस युनिसेफ़ने खरेदी करून केंद्र सरकारला दिलेत. भारत बायोटेकच्या लसींची खरेदी तर याहून कमी प्रमाणात करण्यात आलीय.  कोरोनाला रोखण्यासाठी  लॉकडाऊन हा कायमस्वरूपी उपाय ठरत नसल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे  कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर लसीकरणाचा वेग प्रचंड वाढवण्याची गरज आहे.