Dilip Gandhi : माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये होते मंत्री
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.
दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. 2009, 2014 ला देखील ते पुन्हा निवडून आले.
2003-2004 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांना तिकिट नाकारलं गेलं. त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र तरीही नाराज न होता त्यांनी पक्षाचं काम सुरुच ठेवलं.