नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता मोदी अॅक्शन मोड मध्ये आले आहेत. आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. 


देशात कोरोनाचे लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी या विषयावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. 


कोविड 19 विरोधातल्या एकत्रित  लढाईत भारताने आज अनेक उच्चांक नोंदवले आहेत. भारताने लसीकरणात 3.29 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी देशात एका दिवसात सर्वाधिक तीस लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. केवळ 15 दिवसात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1 कोटीहून अधिक लाभार्थीना  लस देण्यात आली


आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3,29,47,432 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 74,46,983  एचसीडब्ल्यू (पहिला डोस), 44,58,616 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस), 74,74,406 एफएलडब्ल्यू (पहिला डोस) आणि 14,09,332  एफएलडब्ल्यू (दुसरा डोस) यांचा समावेश आहे.  विशिष्ट अन्य आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 18,88,727 लाभार्थीना पहिला डोस देण्यात आला  तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1,02,69,368 लाभार्थीना लस देण्यात आली.


मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील व व्यवस्थापनच्या शाळांमधील शिक्षकांना पुढील आदेश मिळेपर्यत वर्क फ्रॉम होम


लसीकरण मोहिमेच्या (दि .15 मार्च 2021) 59 व्या दिवसापर्यंत, एकूण 30,39,394 लस मात्रा देण्यात आल्या आहेत . त्यापैकी 26,27,099 लाभार्थीना 42,919 सत्रांमध्ये पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला  आणि 4,12,295 एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस मिळाला.


महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात  15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये  1,054  नवीन रुग्ण आढळले आहेत.


ठाण्यात कोविशील्ड ऐवजी कोवॅक्सिन लस देण्यावरुन गोंधळ, लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे