एक्स्प्लोर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलांचे आणि बोगदयाचे काम युध्द पातळीवर सुरू

पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. एमएसआरडीसीने यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंकचे नियोजन केले आहे. चार पदरी असणारा हा बोगदा साधारणपणे 24 मीटर रुंद असून आपातकालिन स्थितीत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करता येईल, अशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई : 10 मीटरच्या ट्विन टनेलच्या बोगद्यांचे एकत्रित 634 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावर सध्या दोन बोगदे आणि दोन पुलांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे मुंबई-पुणे प्रवासातील अंतर 6 किमीने कमी होणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. मिसिंग लिंक या नावाने ओळखला जाणार्‍या या मार्गावरील मुंबईच्या दिशेने 540 मीटरचा बोगदा पूर्ण झाला आहे. तर पुण्याच्या दिशेने जाणारा 94 मीटरच्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. एमएसआरडीसीने यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंकचे नियोजन केले आहे. चार पदरी असणारा हा बोगदा साधारणपणे 24 मीटर रुंद असून आपातकालिन स्थितीत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करता येईल, अशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली आहे. खंडाळा घाटातील बहुंताश दगड हा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला असल्याने तो फोडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही अपघाताशिवाय बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. बोगदा तयार करत असतानाच सिमेंटीकरणाचे कामही सुरू असल्याने दगड सुटून अपघात होण्याच्या घटनांना पायबंद घालण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे 200 कर्मचारी आणि अभियंते सतत काम करत असल्याने, कुठल्याही स्वरुपाचा धोका नसल्याचीही माहितीही त्यांनी दिली. कामाचा वेग विचारात घेता, नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल असा विश्वास अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये मिसिंग लिंकचे कंत्राट ऍफकॉन इन्फ्रास्टक्चर आणि हैदराबादस्थित नवयुगा इंजिनियरिंग कंपनीला 6 हजार 695 कोटींचे कंत्राट तीन वर्षासाठी देण्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. या बोगद्यातील अंतर्गत अग्निसुरक्षेवर सुमारे 130 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.यात स्मिंकलर्स आणि स्मोक डिटेक्टर्स अलार्मचा समावेश आहे. या मिसिंग लिंकच्या कामासाठी परिसरातील सुमारे 5 हजार झाडांवर कुर्‍हाड चालविली जाणार आहे पण त्या बदल्यात एमएसआरडीसीतर्फे एक्सप्रेसवेच्या दुतर्फा सुमारे 40 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget