Pradip Kurulkar : RSS ने कुरुलकर अन् नथुराम गोडसेंच्या बाबतीत सारखंच केलं; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल
प्रदीप कुरुलकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असल्याचं सांगितलं आहे. त्यातच मागील 14 वर्ष संघाचं काम केलं आहे घरातील चौथी पीढी संघात कार्यरत असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
Pradip Kurulkar : पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देणारे डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. नग्न व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांनी ही माहिती दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रदीप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडीओवरुन आता विरोधकांनी त्यांच्यावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे.
प्रदीप कुरुलकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असल्याचं सांगितलं आहे. त्यातच मागील 14 वर्ष संघाचं काम केलं आहे घरातील चौथी पिढी संघात कार्यरत असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. मात्र या व्हिडीओवरुन आता भाजप आणि संघाची चांगलीच कोंडी झाल्याचं बघायला मिळत आहे.
त्यांचा हाच व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला आहे. ट्वीट करुन त्यांनी भाजप आणि संघावर चांगलाच निशाणा साधला आहे. 'प्रदीप कुरुलकर यांचा चार पिढ्यांपासूनचा संघाशी संबंध आहे. कुरुलकर पाकिस्तान एजंट निघाल्यावर राष्ट्रवादावर बोलणे अडचणीचे ठरेल पाहून कोण कुरुलकर? झाले. अडचण झाली की संघ हात वर करतो. नथुराम स्वयंसेवक होता असे गोपाळ गोडसे म्हणाला. संघाने हात वर केल्याचे गोडसे कुटुंबियांना दुःख आहे.', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
प्रदीप कुरुलकर यांचा चार पिढ्यांपासूनचा संघाशी संबंध आहे. कुरुलकर पाकिस्तान एजंट निघाल्यावर राष्ट्रवादावर बोलणे अडचणीचे ठरेल पाहून कोण कुरुलकर? झाले. अडचण झाली की संघ हात वर करतो. नथुराम स्वयंसेवक होता असे गोपाळ गोडसे म्हणाला. संघाने हात वर केल्याचे गोडसे कुटुंबियांना दुःख आहे. pic.twitter.com/fwW7IZJLpf
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 9, 2023
कुरुलकर कसे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात?
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. या संवादा दरम्यान डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबारोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.