एक्स्प्लोर

Pune news : समोस्यात कंडोम भरले अन्.... पुण्यात प्रतिस्पर्धी कंपनीचा काटा काढण्यासाठी दोघांचा कट, अंगावर शिसारी आणणारा प्रकार

प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी  पुण्यातील  एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोश्यात   (Samosa) कंडोम  (Condom) टाकल्याचा (Pune Crime News) किळसवाणा प्रकार आढळून आला आहे

पुणे : प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी  पुण्यातील  एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोश्यात   (Samosa) कंडोम  (Condom) टाकल्याचा (Pune Crime News) किळसवाणा प्रकार आढळून आला आहे.  कॅन्टीनचे (Canteen) कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले, ते परत आपल्याला मिळावे. या हेतुपूर्वक हा कट रचण्यात आला होता,  अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  हा प्रकार पाहून सगळेच चक्रावले होते. 

नेमकं काय घडलं?

एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोश्यात कंडोम आढळलं. हा किळसवाणा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले, ते परत आपल्याला मिळावे. या हेतुपूर्वक हा कट रचण्यात आला होता. संडोमसह तंबाखु जन्य पदार्थ आणि दगडं ही आढळली आहेत. याप्रकरणी एका कामगाराला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. 

बँडेज पट्टी आढळल्यानं केलं होतं कॉन्ट्रॅक्ट रद्द

औंध येथील एका कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे ठेके घेते. पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित कंपनीच कॅन्टीन तीच कंपनी चालवायची. या कंपनीने सुरुवातीला एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीला ठेका दिला होता. मात्र त्यांनी पुरविलेल्या समोस्यामध्ये प्रथमोपचार पट्टी (बँडेज) आढळली, त्यामुळं समोसा पुरविण्याचा त्यांचा करार रद्द करण्यात आला. त्यांच्याजागी मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीसोबत करार करण्यात आला. 

समोसे  नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये पोहचले अन्...

ही बाब  एसआरएस कंपनीच्या मालकांना समजली. मग रहीम शेख, अझर शेख आणि मजहर शेख या तिन्ही मालकांनी एक कट रचला. या कटात कामगार फिरोज शेख आणि विक्की शेख यांना सहभागी करून घेतलं. या दोघांना विश्वासात घेत आरोपी मालकांनी त्यांना मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीत कामाला पाठवले. या दोन्ही कामगारांनी एसआरएस कंपनी मालकांनी रचलेला कट आखला आणि समोस्यात कंडोम, तंबाखूजन्य पदार्थ आणि दगडं टाकली. हे समोसे त्या नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये पोहचले. कामगार नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये समोसा खाण्यासाठी आले, तेव्हा हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला. याप्रकरणी औंध येथील खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरने गुन्हा दाखल केला. त्यानुसार चिखली पोलिसांनी फिरोज या कामगाराला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

इतर महत्वाची बातमी-

Nilesh Ghaiwal : परेड काढली, दम दिला तरीही अरेरावी संपेना; गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका, पुण्यातील रस्त्यावर नेमकं काय घडलं?

Pune Crime News : अभी पार्टी बंद है! पुण्यातील प्रसिद्ध पबवर पोलिसांची धडक कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीEknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Embed widget