एक्स्प्लोर

पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार : मुख्यमंत्री

देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 49 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय आणि त्यापैकी सर्वाधिक पुण्यात येत असल्याचे सांगत पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे  : केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या विविध योजनांच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला जागतिक स्‍तरावरील शहर बनविण्‍यात येईल, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 49 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय आणि त्यापैकी सर्वाधिक पुण्यात येत असल्याचे सांगत पुण्याला देशातील एक नंबरचं शहर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिका व महामेट्रोच्‍या संयुक्‍त विद्यमाने साकारण्‍यात येणाऱ्या  कर्वेनगर भागातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्‍यमंत्री फडणवीस म्हणाले की,  पुणे शहरात महामेट्रोच्‍या माध्‍यमातून मेट्रोचे जाळे विणण्‍यात येत असून यामुळे वाहतुकीच्‍या समस्‍येवर कायमस्‍वरुपी उपाय होईल. एखादे शहर जागतिक स्‍तरावर विकसित होत असेल तर त्‍यामध्‍ये तेथील सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेचा महत्‍त्वाचा वाटा असतो. मेट्रो हा वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्‍ध होऊ शकतो. ही सुविधा प्रदूषणमुक्‍त, वेगवान आणि सुरक्षित आहे. या वाहतूक  सुविधेच्‍या क्षमतेत वाढही करता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबई, पुणे आणि नागपूरमध्‍ये मेट्रो वाहतूक सक्षम करण्यावर भर दिल्‍याचेही मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. ज्यांना घर नाही अशा गरीब लोकांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार आहे. जमीन देवून त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्‍यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.  महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत असून त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिली आहे, असे  मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या चार वर्षांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुण्यात येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी खासदार अनिल शिरोळे यांना की पालकमंत्री गिरीश बापट यांना यावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचं वजन खासदार अनिल शिरोळे यांच्या पारड्यात टाकलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget