एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? समाज म्हणून आपण... लोहगड केसवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Maharashtra Crime : नसरापूर प्रकरणात न्यायालयाने विक्रमी वेळेत सुनावणी पूर्ण केली असून आरोपीला शिक्षा होणार आहे. अशा प्रकरणांमध्ये यापुढे जलदगतीने न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) केस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. अशा शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यामागे सामाजिक अँगल तपासला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी (Devendra fadnavis) दिली. त्याचवेळी नसरापूर प्रकरणात (Nasrapur Case) न्यायालयाने जलदगतीने तपास पूर्ण केला असून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

पुण्यातील लोहगड केसमध्ये (Lohagad Crime) केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. 

लोहगड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरच्या मुलांमध्ये अशी सूडबुद्धी का तयार होते? यामागे गुन्हेगारीसोबतच सामाजिक अँगल तपासला गेला पाहिजे.

CM On Nasrapur Case : नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंड होणार

नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या 29 जून रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नसरापूर प्रकरण हे दुर्मिळ प्रकरण असून दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, ती न्यायालय मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस सुरू चालवली आणि विक्रमी वेळेत निकाल दिला. या केसमुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यामध्ये जलदगतीने शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Nasrapur Case : नसरापूरमध्ये काय घडलं? 

पुण्यातील नसरापूरमध्ये 1 मे 2026 रोजी 65 वर्षीय नराधमानं साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली होती. महाराष्ट्र पुन्हा एका पाशवी अत्याचारानं हादरला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आरोपीला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीनं बलात्कार करुन हत्या केल्याचं कोर्टानं म्हटलं. मात्र न्यायाधीशांनी आरोपीला 'तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे' असं विचारलं तेव्हा आरोपीनं पुन्हा खोटं बोलून बनाव रचण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी 15 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. याप्रकरणी तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यात निकाल लागणारा हा राज्यातील सर्वात वेगवान ऐतिहासिक खटला ठरला आहे. त्यामुळे चिमुरडीचे हालहाल करुन तिचे लचके तोडणाऱ्या हैवानाला फाशी होणार की नाही याचं उत्तर 29तारखेलाच मिळेल. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Advertisement

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget