एक्स्प्लोर

Shivendraraje Bhosale : छत्रपती संभाजी महाराजांची ओळख धर्मवीरच : शिवेंद्रराजे भोसले

आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर' म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं म्हणत  भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Shivendraraje Bhosale : आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर' म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं म्हणत  भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधीपक्ष (Chhatrapati Shivaji Maharaj) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं (Hindu Janakrosh Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. त्यात शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मागील काही दिवसांपासून सगळीकडे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. हिंदू समाजात देखील भीतीचं वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. शिवाय मोदीही आहेत. राज्यात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी धर्माचं रक्षक करावं हादेखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आहे. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले. 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा बलिदान दिवस धर्मवीरदिन (Dharmavir din) म्हणून साजरा करावा. प्रेमाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या लव्ह जिहाद (Love jihad) विरोधात कायदा व्हावा. धर्मांतर होऊ नये, त्यासाठी कायदे करण्यात यावेत. गोहत्या (cow slaughter) थांबवण्यात यावी. या सगळ्यांबात कायदे करावे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी, या  मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. 

कार्यकर्ते आणि महिलांचा मोठा सहभाग

या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. त्यासोबतच तरुणांचादेखील मोठा सहभाग दिसत आहे. हजारोंच्या संख्येत अनेक संघटनांचे कार्यकर्तेदेखील हातात भगवे आणि डोक्यावर टोपी परिधान करुन सहभागी झाले आहे. महिलांनी शंख नाद करत मोर्चाला सुरुवात केली. त्यासोबतच दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली. आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग झाले आहेत. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होत आहे. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Embed widget