एक्स्प्लोर

पुण्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये बदल, शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीला परवानगी

लॉकडाऊनमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता येथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

पुणे : राज्य सरकारने चौथा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आता त्यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील लॉकडाऊनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुक, मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, पुण्यात यापूर्वी 69 प्रतिबंधीत क्षेत्र होते. यातील पाच झोन कमी झाले असून पुण्यात आता 64 कंटेन्मेंट झोन आहेत. यापूर्वी 69 प्रतिबंधित क्षेत्रातील 24 भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हे भाग आता रेड झोनमधून वगळण्यात आले आहेत. तर कोरोनाचा प्रभाव वाढलेल्या नवीन 19 भाग हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. 10.48 चौरस मीटर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनाही आता परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय घरमालकाची परवानगी असेल तर घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे. सोसायटी धारकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची परवानगी द्यावी.

लॉकडाऊनमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता येथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आलीय. कुठली दुकाने कधी उघडी राहतील यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येत असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

पुण्यात बसची वाहतूक ही आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ठेवण्यात आली होती. परंतु आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.चौथ्या लॉकडाऊनमध्ये पुण्यातील छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकाने, शेती संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Lockdown 4 Guidelines | लॉकडाऊन 4.0 च्या गाईडलाईन्सनुसार राज्यात काय सुरू आणि काय बंद?काय आहेत नियम?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget