एक्स्प्लोर

Pune news : ना डीजे, ना लेझर, ना दणदणाट; पुण्यात आंबेडकर जयंती डीजेविना साजरी करण्याचा निर्धार

पुण्यासह (Pune) राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंती डीजे आणि लेझर या गोष्टी टाळून करावी, असे आवाहन पुण्यातील कॅटालिस्ट फाउंडेशनने केले आहे.

पुणे : पुण्यासह (Pune) राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (babasaheb ambedkar) आगामी जयंती डीजे (DJ) आणि लेझर या गोष्टी टाळून करावी, असे आवाहन पुण्यातील कॅटालिस्ट फाउंडेशनने केले आहे. आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांनी जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये, असे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असं वरिष्ठ पत्रकार आणि कॅटालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितलं आहे. 

आंबेडकरी जनतेचे अजूनही शिक्षण,नोकरी असे विविध प्रश्न सुटलेले नाहीत, अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेब ज्ञानसूर्य होते त्यामुळे त्यांना विचारांनी मानवंदना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करावा, यासाठी पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला असल्याचं माने यांनी सांगितलं. 

डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुणांना समजावून सांगा...

ससून हॉस्पिटलच्या 100 मिटर परिसरात डीजेच्या ठेक्यावर तरुणाई नाचत असते हे दुर्दैवी आहे. तसेच लोहगाव विमानतळ परिसरात मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर किरणांमुळे एखादा मोठा विमान अपघाताची शक्यता आहे. डीजेमुळे राज्यात 7 तर पुण्यात 2 जणांचे मृत्यू झाले आहेत. डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुण मंडळांना समजावून सांगितले पाहिजे, असं ते म्हणाले.

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा मोठा दणदणाट

यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा मोठा दणदणाट बघायला मिळाला. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. तर अनेकजणांना बहिरेपणा आल्याचं निदर्शनास आलं होतं. शिवाय शहरात आवाजाच्या पातळीने शंभरी गाठली होती. या आवाजामुळे इतर विकारांनादेखील आमंत्रण मिळतं. यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील दणदणाटावर टीका केली गेली.  त्यानंतर आता येत्या काळात पुण्यात मोठ्या सणांच्या वेळी किंवा आंबेडकर जयंतीला असा दणदणाट होऊ नये, म्हणून पुढाकार घेण्यात आला आणि डीजे न वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यातील आंबेडकर जयंती यंदा शांततेत पार पडताना दिसते का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganesh visarjan Noise Pollution : बापरे नुसत्याच कानठळ्या! मागील 20 वर्षात यंदा सर्वाधिक आवाजाची पातळी, कशी मोजली जाते आवाजाची पातळी?

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget