Atul Bhatkhalkar: सोनिया गांधींची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल
भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी सोनिया गांधींची बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना इडीने चौकशीसाठी बोलावले होते.
Atul Bhatkhalkar: भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या विरोधात पुणे सायबर (pune police) पोलीसांनी सोनिया गांधींची (sonia Gandhi) बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना इडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते.
या प्रकरणावर अतुल भातखळकर यांनी त्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कोरोनाचा इ डी व्हेरिएंट असल्याच म्हटलं होतं. याबाबत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल भातखळकर यांच्याविरोधात संदीप भुजबळ यांनी तक्रार दिली होती. ट्वीटरवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सोनिया गांधीची केली होती बदनामी
कायम वादग्रस्त विधान करुन चर्चेत असलेले अतुल भातखळकर पून्हा एकचा चर्चेचा विषय ठरले आहे. सोनिया गांधी यांची इडी चौकशी सुरु असताना त्यांना कोरोना झाला असं सांंगण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ट्वीटरवरुन खोचक टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी कॉंग्रेसच्या अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यांना कोरोनाचा इ डी व्हेरिएंट असं म्हटलं होतं. मात्र हीच टीका त करणं त्यांना महागात पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील टीक केली होती.
गौरव भाटिया यांनी देखील केली होती टीका
हा देश संविधानाने चालतो. राहुल आणि सोनिया गांधी हे कायद्याच्या वर नाहीत हे ऐका. दोघेही जामिनावर बाहेर आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या नेत्यांचे कोणते अनुचित वर्तन योग्य नाही, हे अत्यंत कडक शब्दात सांगणे आवश्यक आहे. तुम्हाला कोर्टात जामीन मिळाला आहे आणि त्या जामीनाच्या आदेशाने तुम्हाला आरोपी मानले जाते. ही राजकीय द्वेषाची बाब असल्याचे सांगत तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात गेलात. दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले जाणार नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली होती.