एक्स्प्लोर
पुण्यात एसटी-टेम्पोचा भीषण अपघात, 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू
त्र्यंबकेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसनं पंक्चर झालेल्या टेम्पोला ही धडक दिली. पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

पुणे : पुण्यात नारायणगावजवळ एसटीची टेम्पोला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्र्यंबकेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसनं पंक्चर झालेल्या टेम्पोला ही धडक दिली.
पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कांद्यानं भरलेला टेम्पो पंक्चर झाल्यानं चालकानं तो डिव्हायडरशेजारी लावला होता. मात्र मुसळधार पावसामुळे एसटी चालकाला तो दिसला नाही. त्यामुळे एसटीची टेम्पोला जोरदार धडक बसली, ज्यात पंक्चर काढणारा टेम्पोचा चालक आणि हेल्परसह एसटीतील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर आळेफाटा आणि नारायणगावमध्ये उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























