एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे-बंगळुरु महामार्गावर बस नदीत पडता-पडता वाचली
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसला मोठा अपघात झाला. बस मुळा नदीमध्ये पडता-पडता वाचली आहे. अपघातात 9 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पिंपरी : पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बसला मोठा अपघात झाला. या अपघातात बस मुळा नदीमध्ये पडता-पडता वाचली आहे. बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 9 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.बी. लिंक ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारस बस वाकड येथे नदी पुलावर पोहचताच अपघात झाला. बस पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली आणि पुढे जाऊन उलटली.
बसची धडक जोरदार होती, मात्र सुदैवाने कठडा तोडून बस नदीत पडली नाही. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. या अपघातात बेलापूर न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रशीला सचिन पाटील आणि त्यांची चार वर्षीय मुलगी स्वरा ही देखील गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही वेळ कमी झाला होता. अपघातात बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement